Saturday, 11 July 2015

ओळख...टीमचा सिंबॉयसिसच्या विद्यार्थ्यांशी सवांद...


मुंबई- जगविख्यात सिंबॉयसिस विद्यापीठाच्या पुणे येथील सिंबॉयसिस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत ओळख माय आयडेंटिटी या मराठी चित्रपटाच्या टीमने नुकताच सवांद साधला.
जमील खान दिग्दर्शित आणि भूषण पाटील, खुशबु तावडे, अलका कुबल-आठल्ये, अरुण नलावडे अभिनित ओळख माय आयडेंटिटी हा मराठी चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ओळख...टीम या महाविद्यालयात दाखल झाली होती. बिजनेस मैनेजमेंट आणि फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांना ओळख टीमने चित्रपटाविषयी आणि आपल्या भूमिकेबबत माहिती दिली. तर विद्यार्थ्यांनी, निर्माते आणि दिग्दर्शकांकडून चित्रपटाच्या तांत्रिक बाबीवर आणि निर्मीतीव्यवस्थेवर खोलवर चर्चा केली. यावेळी निर्माते हर्षादीप सासन आणि सह निर्मात्या शीतल राजवीर देखील उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment