Tuesday, 1 August 2017

आता सनी लिऑन सुद्धा म्हणतेय 'मला काहीच प्रॉब्लेम नाही'.टॉर्क फार्मा प्रस्तुत आणि फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या ट्रेलरच्या आधीपासूनच मैत्री आणि प्रेमात आपल्या जोडीदाराच्या वागण्यावर 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' म्हणणा-या सेलिब्रिटीज् नी आपले फोटोज् सोशल मिडियावर शेअर केले. अर्थात सोशल मीडिया वर ह्या चित्रपटाच्या ट्रेलरची हवा पसरलेली असून खुद्द सनी लिऑन ने देखील हा ट्रेलर बघून ट्विटर वर 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपटाबद्दल ट्विट केलेलं आहे.

"आत्ताच मी 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' मुव्हीचा ट्रेलर बघितला. आणि मुव्ही बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे". या शब्दात सनी लिऑन ने हा चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता तिने जाहीर केली. नातं म्हणजे अनेकांना जोडणारा एक रेशमी धागा असतो. समीर विद्वांस ने फिल्मी किडा समवेत मराठी फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेल्या ह्या धाग्याने सनी लिऑनला देखील प्रेमात पाडून 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' बोलायला भाग पाडले आहे.अशा ह्या प्रेमळ नात्याच्या रेशमी बंधात स्वतःला बांधून घेत येत्या ११ ऑगस्टला तुम्हीही बघा 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.

No comments:

Post a Comment