Friday, 15 December 2017

राक्षस मध्ये दिसणार सई ताम्हणकर

         


                वर्षाला किमान एक सुपरहिट चित्रपट देणारी सई ताम्हणकर २०१७ मध्ये चित्रपटांपासून थोडी दुरावलेले दिसली. फॅमिली कट्टा आणि वजनदार ह्या चित्रपटातून सईने लक्षात राहतील अशा भूमिका केल्या होत्या.  त्यानंतर मात्र तिच्या प्रेक्षकांना पडद्यावर तिची कमी जाणवत होती. दरम्यानच्या काळात ती अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभागी झाली. परंतु सईचा आगामी चित्रपट कोणता असेल याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. २०१८ मध्ये मात्र सई आपला नवीन चित्रपट घेऊन येतेय. नवीन वर्षाची भेट म्हणून सई लवकरच तिच्या चाहत्यांसाठी 'राक्षस' नावाचा सिनेमा घेऊन येत आहे. राक्षस सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज  करण्यात आले आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.


               आता पर्यंत सईने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे त्यात सई-स्वप्नील ही जोडी प्रेक्षकांना फार आवडली, परंतु पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि शरद केळकर ह्या चित्रपटातून एकत्र काम करताना दिसतील. लई भारी नंतर शरद केळकरचा हा दुसरा मराठी चित्रपट असेल ज्यात तो सई ताम्हणकर सोबत दिसणार आहे. 


        ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित 'राक्षस' सिनेमाची कथा कौटुंबिक पार्श्वभूमीवर बेतलेली असून थ्रिलर सस्पेन्स देखील पाहायला मिळणार आहे. 'नवलखा आर्टस् अँड होली  बेसिल कम्बाइन' चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा बरोबर दिग्दर्शक समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स' 'राक्षस' हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

No comments:

Post a Comment