Saturday, 20 January 2018

दिग्दर्शक संजय जाधवचा 'ये रे ये रे पैसा' तिसरा आठवड्यात वाढीव शोज घेऊन हाऊसफुल!
               गुलाबजाम पाकात चांगला वाटतो, ताकत नाही....असे काहीसे 'येरे येरे पैसा' चित्रपटातील डायलॉग सध्या कानावर पडत आहेत. नवीन वर्षातील मराठी चित्रपटांची सुरुवात दमदार झाली आहे. यावर्षी म्हणजे ५ जानेवारीला रिलीज झालेला पहिला मराठी चित्रपट संजय जाधव दिग्दर्शित 'येरे येरे पैसा' ला प्रेक्षकांचा चांगलाच रिस्पॉन्स मिळत आहे. चित्रपटाला सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड अजूनहि कायम आहेत. 

               चित्रपट प्रदर्शित होऊन २ आठवडे पूर्ण झालेत, आणि मुख्य म्हणजे 'येरे यरे पैसा' तिसऱ्या आठवड्यात देखील थिएटर हाऊसफुल करणार असं दिसतंय. ठाणे, दादर, कांदिवली, वाशी, लालबाग, कल्याण, विरार, कामोठे, उल्हासनगर अशा बऱ्याच शहरांत ये रे ये रे पैसा चे खेळ वाढवले गेलेत. प्रेक्षकांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसाद मुळे 'येरे येरे पैसा' चे शो वाढवले गेलेत. चित्रपटाबद्दल चाहते सोशल मीडिया वर बोलत आहेत.
            
             "चित्रपटाचे शो वाढले आणि लोकांना चित्रपट आवडतोय हे पाहून मला फार आनंद झाला आहे, लोकं चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहत आहेत, आणि फक्त चांगला आहे असं न सांगता आम्ही चित्रपट एन्जॉय करत आहोत असं सांगत आहेत", अशा प्रकारे दिग्दर्शक संजय जाधव त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत. 
   
             ‘येरे येरे पैसा’ ही मुख्यत: तिघांची कथा आहे. तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव आणि उमेश कामत ह्यांच्या सोबत संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी हदेखील चित्रपटात जोरदार बॅटिंग केली आहे. तिसऱ्या आठवड्यात प्रेक्षक चित्रपटाला जो प्रतिसाद देत आहेत, त्यामुळे संजय जाधव ह्यांच्यासाठी 'ये रे ये रे पैसाचा तिसरा आठवडाही ठरणार असं दिसतंय!

No comments:

Post a Comment