Thursday, 1 February 2018

फिटनेस फ्रिक अमृता

 

                नुकत्याच झालेल्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?'  ह्या सोहळ्यात अभिनेत्री अमृता खानविलकर चा धमेकदार नृत्य पाहून प्रेक्षकांनी तिला भरभरून दाद दिली आहे. सोहळ्याची तयारी पासून ते सोहळा संपन्न होईपर्यंत अमृताचा कमालीचा उत्साह तिने टाकलेल्या सोशल साईट वरच्या विडिओ वरून दिसत आहे. विडिओ मध्ये ती डान्स ची रिहर्सल करताना दिसते.

          त्यावर नुकतंच तिने सोशल साईट वर  लाईव्ह येऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. ह्या वेळी आणखी एक घोषणा तिने केली ती म्हणजे नव्या वर्षात अमृता फिटनेस बद्दल चाहत्यांना काही टिप्स देणार आहे. "तू फिट काशी राहतेस किंवा तू मुळातच बारीक आहेस असं अनेकांनी मला सांगितलं पण असं नसून फिटनेस साठी सातत्य आणि मेहनत ह्या दोन गोष्टींचा सामना करावा लागतो आणि म्हणून पुढचे काही महिने मी फिटनेस वर बोलणार आहे" असं अमृता सांगते. या लाईव्ह चॅट मध्ये चाहत्यांनी तिला राजकारणात यायचा विचार आहे का? ते तिच्या आवडत्या कलकारा बद्दल प्रश्न विचारले. 

               सध्या अमृता डान्स इंडिया डान्स चं सुत्रांसंचालक करत आहे तर मेघना गुलजार दिग्दर्शित 'राझी' ह्या हिंदी चित्रपटात ती दिसणार आहे.

No comments:

Post a Comment