Friday, 16 March 2018

फेसबुक हॅकिंगच्या प्रकाराने सावनी धास्तावली!!सावनी रवींद्र आपल्या सगळ्यांची लाडकी झाली  तू मला, मी तुला.." या  गाण्याला तिने दिलेल्या गोड आवाजामुळे. गुरुवार ची सकाळ, सावनी खडबडून जागी झाली, जेव्हा तिने ई-मेल वाचले, ज्यात तिचा अकाउंट हॅक झाल्याचा  उल्लेख होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावनी चे  फेसबुक पेज आधल्या रात्रीच हॅक झालं होतं, पण रात्रं असल्यामुळे ते तिच्या लक्षात नाही आलं. आपलं फेसबुक पेज कोणीतरी हॅक केलाय हे सावनीला  समजताच, तिने ताबडतोब फेसबुकच्या मुख्य कार्यालयात आपली तक्रार नोंदवली. 
सुदैवाने, हॅकरने काहीही पोस्ट केले नाही आणि आता खाते नवीन पासवर्डसह सुरक्षित केले गेले आहे. 
सावनी म्हणते, " सेलिब्रिटि अकाउंट्सची हॅकिंगची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. काही महिन्यांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीचा अकाउंट हॅक झाला होतं. तिची माहिती व नाव बदलण्यात आलं होतं. नशिबाने माझ्या बाबतीत असा अनुचित प्रकार घडला नाही. पण हे खरोखरच भयानक आहे एखाद्या कलाकारासाठी त्याचं सोशल मीडिया अकाउंट हॅक होणं. आमचा अकाउंट १चा दुरुपयोग होऊ शकतो. अशा आहे, ह्याचा पुढे असं होणार नाही. मी आधीच संबंधित लोकांकडे याची नोंद केली आहे आणि मला खात्री आहे की हॅकर लवकरच पकडला जाईल. "   

No comments:

Post a Comment