Tuesday, 25 July 2017

'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपटाचा ट्रेलर लाँच
टॉर्क फार्मा प्रस्तुत आणि फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या चित्रपटाचे निर्माते पी. एस. छतवालरिचा सिन्हा आणि रवि सिंग तर दिग्दर्शक समीर विद्वांसबरोबरच चित्रपटातील कलाकार स्पृहा जोशीगश्मीर महाजनीकमलेश सावंतसीमा देशमुखमास्टर आरश गोडबोले, करण भोसले आणि पटकथा संवाद लेखक कौस्तुभ सावरकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

उपस्थितीत कलाकारांबरोबरच निर्मिती सावंत, विजय निकम, मंगल केंकरे, ज्येष्ठ रंगकर्मी सतिश आळेकर आणि डॉ. साहिल कोपर्डे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. बऱ्याच हिट मालिका प्रेक्षकांसमोर आणणारे दिग्दर्शक विनोद लव्हेकर समीरच्या चित्रपटात अभिनय करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने सतत मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत आपल्या प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरूणाईचे प्रॉब्लेम्स आणि त्यावर कसा तोडगा ही तरूणाई काढू शकते याचं चित्रण मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

समीर विद्वांस दिग्दर्शित या सिनेमाची कथा निर्माते रवि सिंग यांची असून त्याला साजेसं संगीत ह्रषिकेश-सौरभ-जसराज यांनी दिलं आहे. गुरू ठाकूर आणि वैभव जोशी यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांना बेला शेंडेप्रियांका बर्वे,आनंदी जोशीअभय जोधपूरकरश्रृती आठवलेबरोबरच संगीत दिग्दर्शक जसराज जोशी यांचे सुमधूर स्वर लाभले आहेत.

तेव्हा आपले प्रॉब्लेम्स सोडवायला नक्की पहा
'मला काहीच प्रॉब्लेम नाहीयेत्या ११ ऑगस्ट ला...

No comments:

Post a comment