Thursday, 31 January 2019

राकेश बापट - अनुजा साठे करत आहेत ‘व्हॉट्सॲप लव’


‘व्हॉट्सप लव’ बंधनात राकेश बापट आणि अनुजा साठे


हिंदी आणि मराठी दोन्ही मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने स्वतंत्रपणे नाव कमावलेले हॅन्डसम हंक राकेश बापट आणि स्टारची फेवरेट बेटी अनुजा साठे हे दोघे ‘व्हॉट्सप लव’ बंधनात अडकणार आहेत.बॉलीवूड आणि हिंदी टेलिव्हीजनवर प्रेक्षकांची पसंती मिळविलेल्या ह्या दोन्ही कलाकारांनी मातृभाषा मराठीतही अनेक चित्रपटांमध्ये स्वतंत्रपणे प्रमुख भूमिका साकारल्या असल्या तरी ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘व्हॉट्सप लव’ ह्या मराठी चित्रपटात दोघे पहिल्यांदा एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे हिंदी मनोरंजनविश्वाला दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या जोडीची मराठमोळी ‘व्हॉट्सप लव’ स्टोरी पाहणं औत्सुक्याचे ठरेल.  

शो मॅन म्हणून संगीतविश्वात ओळखले जाणारे हेमंतकुमार महाले यांची कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती असलेल्या ‘व्हॉट्सप लव’ ह्या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पोस्टरवर एकमेकाकडे पाठमोरे परंतु एकाच टेबलवर हातात मोबाईल घेऊन बसलेले राकेश बापट आणि अनुजा साठे आणि त्यात अनुजाचं राकेशच्या मोबाईल मध्ये तिरक्या नजरेने पाहणं चित्रपटाच्या आशयासंदर्भात अनेक संकेत देऊन जातात. त्यामुळे चित्रपटाचे शीर्षक आणि पोस्टर पाहून चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण होते.

“व्हॉट्सप लव ह्या चित्रपटाची कथा ही सध्या जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या न त्या मार्गाने घडत आहे. कृत्रीम संबंध, भावभावना जोपासताना तारेवरची होणारी कसरत आणि भौतिक सुखाचा माग घेताना सांडत चाललेला खरेपणा आणि आलेले एकाकीपण नव्या संपर्कयंत्रणेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत बनवला आहे. आणि व्हॉट्सप वापरणाऱ्या प्रत्येकाला हा चित्रपट पाहून आनंद होईल, याची मला खात्री आहे असे कथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माता हेमन्तकुमार महाले यांनी सांगितले.

व्हॉट्सप हा सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. केवळ व्हॉट्सप वरून सर्वांशी संपर्कात राहाता येत असल्याने युवकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेत. व्हॉट्सप वरून आलेल्या संदेशातील भावभावनांचा ओलावा किंवा शब्दांमागील भावार्थ ज्याच्या त्याच्या समजण्यावर अवलंबुन असतो. त्यामुळे अनेक समज - गैरसमज निर्माण होतात आणि पुढे प्रसरण पावतात. पण, थेट संवाद साधण्यासाठी न धजावणाऱ्या व्यक्तिलाही आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं अधिक सोपे वाटू लागल्याने प्रेम प्रकरणात व्हॉट्सप मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे. पण, ‘व्हॉट्सप लव’ ह्या सिनेमाची व्हॉट्सप लव्हस्टोरी नेमकी काय आहे? हे फक्त राकेश बापट आणि अनुजा साठे ह्या दोघांनाच माहिती. त्यामुळे हे व्हॉट्सप लव प्रकरण जाणून घेण्यासाठी हेमंतकुमार म्युझिकल ग्रुपची निर्मिती असलेला व्हॉट्सप लव ह्या चित्रपटाची ५ एप्रिल पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या कॅमेऱ्याने टीपला असून पिकल एंटरटेनमेन्टचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी हे वितरणाची धुरा वाहणार आहेत.


For Publicity
Rakesh Bapat - Anuja Sathe are in 'Whats Love' Releationship


Handsome hunk Rakesh Bapat, who have earned fame in both Bollywood and and Marathi film industry is in 'Whatapp Love' relationship with Star’s favorite Daughter, Actress Anuja Sathe. Yes, we are talking about upcoming Marathi movie “Whats App LOVE”. Although both of these artists, proved themselves in Bollywood and Hindi television industry, also independently played many films in mothertongue Marathi, will appear together first time in the Marathi film 'Whatspe Love', which will be released on 5th April. So, watching the 'WhatsApp Love' story of a pair of Bollywood entertainers in Marathi is quite exciting.

Mr. Hemantkumar Mahale, who known worldwide as ShowMan of Musical Concerts, has written, directed and produced his first dream 'Whatspe Love'. He revealed first look of his movie. The Poster indicated the germ of entertainment.  Rakesh Bapat and Anuja Sathe, who are sitting on a table… showing back to each other… mobile in one hand… Anuja peeping in Rakesh’s Mobile with tilt eye,. the gestures of actors and title of the film are raising curiousity about the film.

The story of "What's Love" is now happening in almost everybody's life. While running in today’s world, we failed to maintain real relationship and trying to develop it through electronic mode of communication e.g. gazettes and Applications. This movie is bilingual, made in Marathi and Hindi. Everybody, who uses WhatsApp will be happy after watching this movie, "said the story writer, director and producer Hemantkumar Mahale.

Now a days, WhatsApp became an important part of our life. Thus, Smartphones come in everyone's hands. So, to experience this exciting love affair of celebrity like Rakesh and Anuja, you will have to wait for April 5. The film is shot by the camera of senior cinematographer Suresh Suvarna, while Pikle Entertainment's Sameer Dixit and Rishikesh Bhirangi are looking after distribution.

No comments:

Post a Comment